तू बैस । मी आलो आहे । तुझ्या स्वप्नात
माझ्या घरात । तू स्मरत आहेस ।
जोपासलेलं माझं स्वप्न
तूच म्हणतोस । ‘माझा उच्चांक’।
तुझ्या शब्दात पसलाय
वादळी मनोर्यात । तू एकवटताना
माझा शब्ध बांधीव । अनपेक्षित गंभीर
फाटक ध्वज । फडफडताना
वारा येईल तशी दिशा फिरली
प्रश्न ठाम होता । कुठे ?
अस्तित्व म्हणजे काय ? मरायचं की जगायचं
माझा पुरावा तुझं स्पन्न । वाट पाहील
मी गरोदर ठेवलंय । तुझं माझं स्वप्न
पाणी जगतंय । ठिबकतंय
मनात । खूप मोठ्ठं आडवळण पसरलंय । गुंतलंय
तूर्त । मंजूळ धार । एकात एक
सतत । थरथरतो समुद्र । हवा तसा एका पाठोपाठ
चुकवतो अवघा हिंदोळा ।
हमखास पाण्याचं जग । सर्वत्र ।
बेभरवशाचा अचूक नियम । प्रस्थापित
थेंब थेंबाळू । तळं । जळतंय ।
स्वप्नडोहात
मी भयंकर तहानलोय
शेवटचा थेंब । ठिबकताना
माझं ऐक्य । डोलारा
सावलीत । झूल झुलताहेत भ्रमनिरास
निखळ तारतम्य । हेलकावत
स्वतंत्र अविचार । डोलकाठी पदर । झळकताहेत
गाढ तळ । बुडबुड्यात । बुलंद आवाज
गडप होताना । एकवटलेला प्राण
सर्वंकष दृष्टी । स्थिर होताना
डगमगतंय दिवास्वप्न । एककल्ली
प्रत्येक पाऊल
असावध । स्वप्नतोल
स्तब्ध आर्तमंडळ । पहा
प्रत्येक दिशा । वेगवेगळ्या रंगात । भ्रमात
अविचल कुंपणात । फिरते मनोर्याची सावली
सकाळकडून संध्याकाळ
गती । ठामपणे हवा असलेला अव्हेर
संयुक्त अज्ञानबळ
भिनतंय । पुन्हा पुन्हा
डोळसपणे । जबर अभोगी आव्हान
जग जगण्यासंबंधी आहे । सूर्यासमोर ।
स्वप्नभेद ।
कोणत्या दिशेला ?
तू किंवा व्यतिरिक्त । अस्तित्वाचं मीपण
नसताना तू । ढगाच्छादित एकोपा । तुझ्यासाठी
एकांत कडेलोट । तू अनिश्चितपणे ऐक सांत्वन
मुक्त. मानव. मरण. माती । शिवाय भस्मकल्लोळ ।
मी जपत आहे । तुझं भान
थारोळ्यागत आकांत । ओळीनं सतत
माझं क्षुद्रपण । चरण्यासाठी कुरण
आयुष्याचा संदर्भ ।भूमिगत नैराश्य
आंधळ्या डोहाळपणाइतकं उत्कट
तुझं अतृप्त मौन । माझ्या जमेला
पार्श्वभूमीवर --------
तुझं - माझं स्वप्न । निराकार अंतर
नंतर ?
जन्माचा ओघ । चिवट निष्प्राण
प्रतीक्षा । अस्फुट अशब्द ।
स्वप्नफूल ।
सापडलय उत्खननात ।
No comments:
Post a Comment