अस म्हणत ...
खूप खूप, उभा आडवा, विचार विस्तार केला । पण टिंब टिंब ...
खूप खूप, उभा आडवा, विचार विस्तार केला । पण ... पण...
आजूबाजूचा कोणताच व्यवहार समजलाच नाही.
म्हणून
खूप खूप, खोल मनात घरात, डोकाऊन पाहिलं ।
पण टिंब टिंब ...
खूप खूप, खोल मनात घरात, डोकाऊन पाहिलं ।
पण ... पण ...
प्रत्येक घर, सुजल्यागत,
सडत रडत असलेलं दिसलं.
मग
खूप खूप, दूर दूर, फिरून आलो । पण टिंब टिंब ...
खूप खूप, दूर दूर, फिरून आलो । पण ... पण ...
फिरण्याचे, नि:संदिग्ध अर्थसुद्धा, फिरतच राहिले.
फिरून
खूप खूप, सोसत असोशिनं सहन करत गेलो । पण टिंब टिंब ...
खूप खूप सोसत असोशीनं सहन करत गेलो । पण ... पण …
सोसलेलं जोजवलं, जोजवलेलं जोपासलं तर जिव्हाळ्याचा जुगाड झाला.
मग खूप खूप शून्ये गोळा करत गेलो । पण टिंब टिंब ...
मग खूप खूप, शून्ये गोळा करत गेलो । पण ... पण ...
सर्व शून्ये आतून बाहेरून चकचकीत शुद्ध
मी मात्र आतून हतबुद्ध

हतबुद्ध आतून
मी हतबुद्ध
शून्यातला मी, हतबुद्ध
टिंब टिंब, किंवा.
No comments:
Post a Comment